आज सर्वाना सांगण्यास आनंद होत आहे की ‘जयहिंद फाऊंडेशन’ या आपल्या संस्थेची मगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी सातारा जिल्ह्यातील जावली शाखेची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली .
जयहिंद फाऊंडेशन जावलीशाखा स्थापना कार्यक्रम साठी जावली तालुका गटविकास अधिकारी श्री सतिश बुद्धे साहेब, तसेच मेढा जावळी पोलिस उपनिरीक्षक अजित पाटिल साहेब, जयहिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने साहेब व संचाकल मंडळ यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम उत्कृष्ठ रित्या संपन्न झाला.
जयहिंद फाऊंडेशन बाबतची प्रस्तावना श्री अभिमन्यु परामने सर यांनी दिल.
जावली शाखेची सुरुवातच जावली तालुक्यातील हुतात्मा शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याने सुरुवात झाली.
शहीद सैनिक परिवार बहुमान:
१) शहीद नवनाथ कोंडीबा सुर्वे. गाव- घरातघर. शहीद दिनांक ०९/०२/२००६
२) शहीद शशिकांत तुकाराम मोरे. गाव – सावली.
३) शहीद पांडुरंग मारुती सुतार. गाव – कुसुंबी शहिद दिनांक – २९/०३/२०१५
४) शहीद संदीप प्रकाश ईथापे. गाव – मोरघर , शहीद दिनांक २७/०५/२०१७.
५) शहीद रविंद्र बबन धनावडे. गाव – मोहाट, शहीद दिनांक – २६/०८/२०१७.
६) शहीद अशोक धनाजी जाधव. गाव – मेढा. शहीद दिनांक ०५/११/२०१८
या शहीद परिवारांचा बहुमान करण्यात आला,
तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व आजी माजी तसेच नवीन सैन्यात भरती झालेल्या सर्वांचा सन्मान करण्यात आला. या पुढील काळात जावलीच्या शाखेच्या वतीने जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहनार असल्याचे प्रमुख पाहुन्यांनी सांगितले.
गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांनीया संस्थेच्या स्थापनेमुळे जावली तालुक्यात एक वेगळ्या पद्धतिची शाखा सैनिकांसाठी काम करण्यासाठी पुढे येत असल्याने सर्व संचालक व राष्ट्रीय संचालक यांचे कौतुक केले,
पोलीस उप निरीक्षक साहेबांनी या पुढे सैनिक परिवारास कोणतीही मदत लागल्यास नक्कीच कळवा आम्ही आपणास मदत करणार असे सांगून जयहिंद च्या कार्याचा गौरव केला.
जयहिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय संचालक श्री स्वप्नील सर यांनी सैनिक व त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही कायम कृतज्ञ राहू व या परिवाराची अखंड सेवा करू सांगितले .
जावली तालुका शाखा अध्यक्ष श्री रवींद्र कदम सर यांनी सैनिकांच्या साठी जयहिंद फाऊंडेशन घराघरात पोहचवण्याचा निर्धार केला आहे व या कार्यात जावली शाखा मनापासून प्रयत्नशील राहील सांगत सैनिक आपली रक्षा बॉर्डर वर राहून करतात यांच्या परिवाराची रक्षा करणे आपलं प्रथम कर्तव्य आहे व या कार्यात जावली संपुर्ण टीम कार्य करेलच असे सांगितले.
जयहिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने यानीहि यावेळी मार्गदर्शन करताना या संस्थेच्या माध्यमातून आपन सैनिक कुटुंबाच्या अडी अडचणी काय आहेत हे समजून घेवून त्याना हवि ती मदत आपन करण्यासाठी पुढे येवू असे सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रीय संचालक स्वप्निल मांढरे सर, राष्ट्रीय संचालक हनुमन्त चिकने साहेब, सातारा जिल्हा अध्यक्ष जयदीप भोसले साहेब, राष्ट्रीय संचालक तुषार घोरपडे सर, वाई तालुका अध्यक्ष वैभव कदम सर, सौ राजश्री कदम ताई जावली करियर अकॅडमी, यांच्यासह परिसरातील सेवानिव्रुत्त सैनिक, भरती झालेले जवान व हुतात्मा कुटुम्बिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनिर्वाचित जावली शाखा अध्यक्ष रविंद्र कदम, उपाध्यक्ष अनिता गायकवाड मॅडम, अभिमन्यु परामने सर, पत्रकार प्रशांत गुजर साहेब, पत्रकार धनंजय गोरे सर, उर्मिला कदम मॅडम, विनायक कदम सर, दत्ता पवारसर,अनुकूल चिकाटे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली 🙏
धन्यवाद !
अध्यक्ष व कार्यकारी मंडळ जयहिंद फाउंडेशन, जावली
जयहिंद फाऊंडेशन
( सैनिक हो तुमच्यासाठी )