मागील 10 दिवसांपासून पुणे येथे मिलिट्री च्या कमांड हॉस्पिटल मध्ये त्यांचे उपचार चालू होते, परंतु शेवटी काळाने घात केलाच.
वीर जवान भूषण चे पार्थिव शरीर त्यांच्या घरी पोहचले तद्नंतर त्यांची अत्यंत शोकाकुल व अश्रुभरित वातावरनात, भारत माता की जय, वंदेमातरम व वीर जवान अमर रहे च्या उदघोषनेत गावातुन मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने शाहिद स्मारक मैदानावर पोहचली व काही वेळ पार्थिव शरीर लोकांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.
त्यानंतर वीर जवानास सलामी देऊन शासकीय नियमात अंत्यसंस्कार केले गेले.
अंतिम संस्कार पार पडल्यानंतर जयहिंद फाउंडेशन वर्धाचे सर्व सदस्यांनी भूषण दांडेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई, वडील, पत्नी, भाऊ व बहिनीला सांत्वना दिल्या व पुढील सर्व अड़ी- अडचणीत, व सैनिक कल्याण कार्यालयातील कामात जयहिंद फाउंडेशन त्यांच्या परिवारा सोबत राहिल असे आश्वासन जयहिंद चे जिल्हा सचिव श्री संजय उराडे यांनी उपस्थित सर्व आजी-माजी सैनिक व गवकऱ्यां समोर दिले.
हुतात्मा भूषण दांडेकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली!!�
�💐💐💐
ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो.
जयहिंद फाऊंडेशन
( सैनिक हो तुमच्यासाठी )