१९ फेब्रुवारी रोजी ‘शिवजयंती उत्सवानिमित्त’ करंडी, ता.जि. सातारा येथे आयोजित सैन्यात दाखल होणाऱ्या तरुणांचा सन्मान जयहिंद फाऊंडेशन कडुन करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या इंडियन आर्मीच्या भरती मध्ये करंडी येथील दोन युवक मेरिट मध्ये आले आणि थोड्याच दिवसांत ते इंडियन आर्मी मध्ये दाखल होतील.
‘शिव स्वराज्य, करंडी, यांचेकडून शिवजयंती उत्सवात त्या दोन तरुणांचा सन्मान जयहिंद फाऊंडेशन चे सातारा जिल्हा अध्यक्ष अॅड. श्री. जयदीप भोसले व संचालक मेजर. श्री. हणमंत चिकने यांच्या हस्ते करण्यात आला.
अभिजित मोहिते याचा सन्मान जयहिंद फाऊंडेशनचे संचालक मेजर श्री. हणमंत चिकने यांनी केला तर आयुष जाधव याचा सन्मान जयहिंद फाऊंडेशन, सातारा जिल्हा अध्यक्ष अॅड श्री. जयदीप भोसले यांनी केला.
या नंतर भोसले सर यांनी उपस्थित मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ यांना जयहिंद फाऊंडेशन विषयी आणि संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.
जयहिंद फाऊंडेशनचे संचालक श्री. हणमंत चिकने सर यांनी सैनिकांच्या डॉक्युमेंट या विषयी उपस्थित माजी सैनिकांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचलन कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे सदस्य मकरंद देशमुख ( जयहिंद फाऊंडेशन, IT सेल ) यांनी केले तर गावातील पत्रकार सहाय्यक श्री. प्रकाश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास मंडळाचे कार्यकर्ते, करंडी ग्रामस्थ उपस्थित होते.
जयहिंद फाऊंडेशन
( सैनिक हो तुमच्यासाठी )