शिव क्रांती हिंदवी सेना आयोजित ‘शिव जन्मोत्सव सोहळा २०२०’ किल्ले ‘वैराटगड’ पार पडला.”
येथे शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या साठी कार्य तत्पर असणारी जयहिंद फाऊंडेशन’ला आपल्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हे ब्रीद घेऊन शहीद सैनिक परिवारांची अविरत सेवा या कार्याचा गौरव म्हणून ‘शिव क्रांती शिवभूषण पुरस्कार २०२०’ ‘शिव क्रांती हिंदवी सेना’ यांचेकडून देऊन गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार ‘सरदार कान्होजी जेधे’ यांचे ‘वंशज सरदार युवराज जेधे’ यांचे हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार जयहिंद फाऊंडेशन, वाई तालुका अध्यक्ष श्री. वैभव कदम आणि रमजान पुणेकर यांनी स्वीकारला.
महाराष्ट्र राज्यातील जवानांसाठी निस्वार्थी आणि अप्रतिम कार्य करणारी संस्था म्हणून ‘जयहिंद फाऊंडेशन’ला ‘शिव क्रांती हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य’ यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
‘शिव क्रांती हिंदवी सेना, महाराष्ट्र राज्य, यांस जयहिंद फाऊंडेशनकडुन त्यांच्या उत्कृष्ट कार्यास शुभेच्छा दिल्या.
धन्यवाद.,
जयहिंद फाऊंडेशन
( सैनिक हो तुमच्यासाठी )