जयहिंद मित्रांनो जयहिंद,
जयहिंद फाउंडेशन हि संस्था प्रामुख्याने शहीद सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी गेली तीन वर्ष अहोरात्र कार्य करत आहे. शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाच्या अडी अडचणी दूर करणे तसेच समाजामध्ये त्यांना सन्मानाचे विशिष्ठ स्थान मिळावं, समाज आणि ते कुटुंब या मधील दरीं कमी करणे व अशा अनेक समस्या सोडण्याविण्यासाठी हि संस्था कटिबद्ध आहे.
आई वडिलांनी आपला काळजाचा तुकडा गमावलेला असतो , पत्नीने आपलं सर्वस्व गमावलेल असत, तर पिल्लांनी आपला पिता गमावलेला असतो ते फक्त आणि फक्त आपल्या भारमातेच्या रक्षणासाठी अर्थातंच तुमच्या आणि माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी. सर्वोच्च त्याग केला आहे अशा कुटुंबाच्या मागे त्यांच्या भविष्यासाठी आपण खंबीरपणे उभं राहायला हवं.
म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आहे, चला आपण सगळे जयहिंद मध्ये सामील होऊ आणि वेळो वेळी अडी अडचणीत त्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहून यथाशक्ती जास्तीत जास्त आर्थिक योगदान देऊ.
चला तर मग आपण सगळे एका आवाजात म्हणूया सैनिक हो तुमच्यासाठी.
चला तर मग या आपण सगळे एका आवाजात म्हणू या सैनिक हो तुमच्यासाठी.
सैनिक हो तुमच्या साठी...